नुकतीच भारत-श्रीलंका संयुक्त लष्करी सराव 'मित्र शक्ती (Mitra Shakti)'ची १२ वी आवृत्ती श्रीलंकेतील मदुरू ओया येथे सुरू झाली आहे.
ठळक मुद्दे:
- सदर २०२६ सालची १२ वी आवृत्ती श्रीलंकेतील मदुरू ओया येथील 'आर्मी ट्रेनिंग स्कूल'मध्ये सुरू झाली आहे.
- हा सराव २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत १४ दिवस चालणार आहे.
- शारीरिक तंदुरुस्ती सुधारणे, हभागी दलांमधील समन्वय बळकट करणे तसेच कार्यात्मक ज्ञान व सर्वोत्तम पद्धतींच्या देवाणघेवाणीद्वारे संरक्षण सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.
- सदर सराव हा श्रीलंकन लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल निलंथा प्रेमारत्ने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला आहे.
- लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध मंगोत्रा यांच्या नेतृत्वाखाली १७० जणांचे भारतीय पथक यात सहभागी झाले आहे.